गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक निधी उभारणार डाॅ. अजिंक्य डी. वाय. पाटील यांचा मानस, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाला रमेश पाटील यांच्याकडून एक कोटी रुपयांची देणगी

  


पुणे१५ एप्रिल: काेणीही आर्थिक कारणासाठी शिक्षणापासून वंचित राहू नये. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य व्हावे यासाठी शैक्षणिक निधी उभारण्याचा मानस अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डाॅ. अजिंक्य डी वाय पाटील यांनी व्यक्त केला.

सामाजिक कार्यकर्ते  रमेश पाटील आणि  मनीषा पाटील   यांनी तेजनाथ बाबा यांच्या उपस्थितीत अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाला एक काेटी रुपयांची देणगी दिली. यावेळी डाॅ. पाटील बाेलत हाेते. विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकरकार्यकारी उपाध्यक्ष डॉ. कमलजीत कौरसल्लागार  शंकर नारायणउद्याेजक अशाेक खांदवेरमेश पाटील यांचे कुटुंबीय  यावेळी उपस्थित हाेते.

डाॅ. अजिंक्य पाटील म्हणालेगाेरगरीबांसाठी शिक्षण उपलब्ध व्हावे असे स्वप्न मी पाहिले आहे. फी भरता आली नाही म्हणून काेणी शिक्षणापासून वंचित राहायला आहे. असे व्हायला नकाे. त्यासाठीच शैक्षणिक निधी उभारण्याचा मानस आहे. रमेश पाटील यांच्या देणगीने याची सुरूवात झाली आहे.

रमेश पाटील म्हणालेआपण समाजाचे काहीतरी देणे लागताे हा संस्कार डाॅ. डी. वाय. पाटील यांनी दिला. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर काम करत आहे.

डाॅ. एकनाथ खेडकर म्हणालेसमाजकार्यात वाहून घेतलेले सर्वच जण वंदनिय असतात. रमेश पाटील यांचे शैक्षणिक कार्य माेठे आहे.

तेजनाथ बाबा यांनी या कार्यक्रमास शुभाशिर्वाद दिले.Dr. Ajinkya D. Y. Patil's intention to raise an educational fund for needy students, Ramesh Patil donates Rs. 1 crore to Ajinkya D. Y. Patil University
Previous Post Next Post