७ ते १४ वर्षे वयोगटातील मुले ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
३१ डिसेंबर २०२५ दरम्यान https://www.axisbanksplash.in/ वर प्रवेशिका सादर करता येतील.
सहा विजेत्यांना आणि सहा उपविजेत्यांना अनुक्रमे प्रत्येकी ₹१ लाख आणि ₹५०,००० बक्षीस दिले जाईल. दुबईतील ताशकील येथे होणार असलेल्या विशेष कला आणि हस्तकला कार्यशाळेत भाग घेण्याची संधी देखील त्यांना मिळेल.
मुंबई, ३ नोव्हेंबर २०२५: भारतातील खाजगी क्षेत्रातील एक सर्वात मोठी बँक, ऍक्सिस बँकेने 'स्प्लॅश २०२५' सुरु होत असल्याची घोषणा केली आहे. संपूर्ण देशभरातील स्पर्धकांचा सहभाग असलेल्या, दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या कला, हस्तकला आणि साहित्य स्पर्धेचे हे १३वे वर्ष आहे. 'दिल से ओपन' या ऍक्सिस बँकेच्या ब्रँड सिद्धांताला अनुसरून, यंदाच्या वर्षीची संकल्पना आहे "ड्रीम्स" अर्थात स्वप्ने! देशभरातील मुलामुलींना त्यांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जावे हा स्पर्धेचा उद्देश आहे. सहभागी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत https://www.axisbanksplash.in/ वर नोंदणी करून प्रवेशिका सादर करता येतील. त्याचबरोबरीने ऍक्सिस बँकेच्या निवडक शाखा, शाळा, रहिवाशांच्या कल्याणकारी संघटना इत्यादी ठिकाणी देखील स्पर्धांचे आयोजन केले जाईल. भारतभरात ११ लाखांहून जास्त मुले ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने यामध्ये सहभागी व्हावीत असा उद्देश आहे.
प्रवेशिका सादर करण्यासाठी दोन उप-संकल्पना ठरवून देण्यात आल्या आहेत - ७ ते १० वर्षे वयोगटासाठी 'ए डे इन माय ड्रीम लाईफ' आणि ११ ते १४ वर्षे वयोगटासाठी 'द फ्युचर ऍज आय ड्रीम इट' हे विषय आहेत. १०० पेक्षा जास्त ज्युरी या सर्व प्रवेशिकांचे मूल्यांकन करतील. त्यामध्ये अमर चित्र कथाचे ग्रुप आर्ट डायरेक्टर श्री सॅवियो मास्कारेन्हस; रायन इंटरनॅशनल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या डायरेक्टर डॉ स्नेहल पिंटो; आणि द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे मनीं उपाध्यक्ष श्री दीपक पाटील या मान्यवरांचा त्यामध्ये समावेश असणार आहे.
ऍक्सिस बँकेचे प्रेसिडेंट आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर, श्री अनूप मनोहर यांनी सांगितले, "स्प्लॅश ही फक्त एक स्पर्धा नाही, तर एक सर्जनशील मंच आहे, जो मुलांच्या उत्साहाला आणि कल्पनाशक्तीला वाव देतो. ऍक्सिस बँकेमध्ये आम्ही मानतो की, नव्या कल्पना स्वीकारल्या गेल्या पाहिजेत आणि कल्पनाशक्तीला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. मुलांना त्यांची स्वप्ने व्यक्त करता यावीत यासाठी मंच पुरवून आम्ही भविष्यातील नवोन्मेषक आणि नेत्यांच्या जडणघडणीत गुंतवणूक करत आहोत. स्प्लॅशमार्फत आम्ही मुलांना अशा एका जगाची कल्पना करण्यासाठी प्रोत्साहन देतो जे त्यांना घडवायचे आहे, असे जग जे आशा, साहस आणि अमर्याद संधींनी भरलेले असेल. हा उपक्रम सर्वंकष विकासाप्रती आमची वचनबद्धता दर्शवतो, आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी आणि नवोन्मेषाला प्रेरित करण्यासाठी कला आणि कल्पना महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील असा विकास आम्हाला घडवून आणायचा आहे."
यंदाच्या वर्षीच्या संकल्पनेला अनुसरून ऍक्सिस बँकेने 'एआय ड्रीम जनरेटर' सुरु केले आहे. मुलांची स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले हे इंटरॅक्टिव्ह टूल आहे. उडणाऱ्या कार असोत किंवा बोलणारे प्राणी, चंद्रावर एखादे शहर उभारणे असो किंवा अजून काहीही, मुले त्यांची स्वप्ने याठिकाणी व्यक्त करू शकतील, त्यानंतर त्यांना हवे ते माध्यम - कला, हस्तकला किंवा साहित्य निवडून आपली कल्पना प्रत्यक्षात साकार होताना पाहू शकतील.
सहा विजेत्यांना आणि सहा उपविजेत्यांना अनुक्रमे प्रत्येकी ₹१ लाख आणि ₹५०,००० बक्षीस दिले जाईल. दुबईतील ताशकील येथे होणार असलेल्या विशेष कला आणि हस्तकला कार्यशाळेत भाग घेण्याची संधी देखील त्यांना मिळेल. या विजेत्यांच्या कलाकृती बंगलोरमधील म्युझियम ऑफ आर्ट अँड फोटोग्राफी (एमएपी) मध्ये प्रदर्शित केल्या जातील. त्याखेरीज अव्वल ४०० क्वालिफायर्सना लक्सइगो आणि अमेरिकन टुरिस्टर यासारख्या सहयोगी ब्रँडकडून आकर्षक वस्तू आणि व्हाउचर्स बक्षीस म्हणून मिळतील.
मागील वर्षी स्प्लॅशसाठी ऍक्सिस बँकेकडे देशभरातून ९ लाखांहून जास्त प्रवेशिका आल्या होत्या आणि ३३०० पेक्षा जास्त शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. ई४एम इंडियन डिजिटल मार्केटिंग अवॉर्ड्समध्ये या उपक्रमाला बेस्ट इंटिग्रेटेड मीडिया कॅम्पेन आणि १४व्या एसीईएफ ग्लोबल कस्टमर एंगेजमेंट अवॉर्ड्स २०२५ मध्ये क्रिएटिव्ह एक्सेलेन्ससाठी कांस्य पदक देऊन गौरवण्यात आले होते.
