सुप्रीम
कोर्टाने नेमलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) ने जामनगरमधील वन्यजीव काळजी
आणि संवर्धन केंद्र वंतराला सर्व मोठ्या आरोपांतून दिलासा दिला आहे. यामध्ये प्राणी
आणून कार्बन क्रेडिट्स मिळवण्याचा आरोपही समाविष्ट होता.
अनंत
अंबानी यांनी रिलायन्स फाउंडेशन अंतर्गत स्थापन केलेले वंतारा हे जगातील सर्वात मोठ्या
संवर्धन उपक्रमांपैकी एक आहे. येथे हजारो वाचवलेले आणि संवर्धनाखालील प्राणी राहतात
आणि जवळपास 3,000 तज्ज्ञ व कर्मचाऱ्यांची टीम त्यांची काळजी घेते. SIT ने केलेल्या
तपासात स्पष्ट झाले की वंतरावर पाणी संसाधनांचा गैरवापर किंवा कार्बन क्रेडिट्सचा फायदा
घेण्याचे आरोप पूर्णपणे खोटे असून, त्यांना कोणतेही कायदेशीर किंवा वस्तुनिष्ठ आधार
नाही.
SIT
ने हेही स्पष्ट केले की जगात कुठेही असे कोणतेही नियम नाहीत ज्यांत वन्यप्राण्यांना
वाचवणे, त्यांना ठेवणे किंवा त्यांची काळजी घेणे यासाठी कार्बन क्रेडिट्स दिले जातात.
वंतराने कधीही असे क्रेडिट्स मागितले नाहीत किंवा घेतलेही नाहीत. त्यांचे संपूर्ण काम
हे दानशूरतेवर आधारित असून, कोणत्याही नफ्याशी जोडलेले नाही.
सुप्रीम
कोर्टाने SIT चा अहवाल मान्य केला असून प्रकरण संपवले आहे. तसेच वंतराचे वन्यजीवांच्या
कल्याण आणि संवर्धनासाठी असलेले योगदान पुन्हा अधोरेखित केले आहे.